जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे २९ सप्टेंबर रविवार दुपारी खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररीत्या करून ठेवलेला गॅस सिलिंडरचा साठा व रिक्षा असा एकूण पाच लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी सादीक सिराज पिंजारी (४१, रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सादीक पिंजारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउप दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेका विजय पाटील, हरिलाल पाटील, पोकॉ प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, शुद्धोधन ढवळे यांनी केली.