अमळनेर : प्रतिनिधी
भोईवाड्यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी (३२) याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. त्याच्यावर पाचवेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही म्हणून त्याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कारवाई करण्यात आली होती.
मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची मुक्तता करण्यात आली होती. तो परत आल्यानंतर त्याने स्थानिक लोकांशी वाद घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो कारागृहात होता. सण आटोपल्यावर तो अमळनेर शहरात आला होता. पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्यामार्फत विशाल याचा एमपीडीए प्रस्ताव तयार केला. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यावर त्याला स्थानबद्ध करून कोल्हापूर रवाना करण्याचे आदेश दिले.
शनिवारी पोउनि भगवान शिरसाठ, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उज्ज्वल म्हस्के, मंगल भोई यांचे पथक त्याला कोल्हापूर कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले. विशालला झामी चौक परिसरातून अटक करण्यात आली.