अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील फापोरे – मंगरूळ रस्त्यावर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) उघडकीस आली. बिबट्या चिखलात रुतलेला असल्याने त्याचा निमोनियाने किंवा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या बिबट्याचे वय ४ ते ५ वर्षे असावे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ रोजी बिबट्याने एक पारडू फस्त केले होते. वनविभागाने त्याचा पंचनामा करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शुक्रवारी सकाळी फापोरे मंगरूळ रस्त्यावरील शेतात बिबट्या चिखलात रुतलेला मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शव जानवे जंगलात नेऊन त्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.