पारोळा : प्रतिनिधी
पारोळा पो. स्टे, च्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली की, किशोर संजय चौधरी रा. तरवाडे ता. पारोळा ह. मु. सातपुर कॉलनी, नाशिक. हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा पो. स्टे. हद्दीतील आडगाव, तरवाडे, शिवरे या परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो. स्टे. हददीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यावरुन पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो. स्टे च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोहेकॉ/ प्रविण पाटील, पोना/ संदिप सातपुते, पोकों/अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
त्यावरुन नमुद पथक हे साधारण ३ दिवसा पासुन पारोळा शहर व हद्दीत किशोर संजय चौधरी याचा कसोशीने शोध घेत होते. दिनांक १२/०९/२०२४ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर संजय चौधरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हद्दीतुन व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, असे पारोळा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रेस नोट जारी करीत कळविण्यात आले.