जळगाव : प्रतिनिधी
आपल्या राजकीय जीवनांची सुरुवात ज्या एरंडोल तालुक्यातुन झाली त्या तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांचा सप्ताह निमित्ताने कासोदा येथील श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळ यांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली असता.
ना.गुलाबरावजी पाटील यांनी सप्ताह निमित्त देणगी स्वरूपात मदत केली व कीर्तना साठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले त्या बद्दल श्री हरिनाम सप्ताह पंच मंडळ चे अध्यक्ष सोनू शेलार, उपाअध्यक्ष वाल्मिक ठाकरे, सचिव संतोष चौधरी, खजिनदार गोपाल पांडे, सचिव रवी मोरे,गोकुळ शिंपी जितू तांदळे, सुधाम राक्षे, बबन क्षीरसागर, रमेश खैरनार नंदू खैरनार, दगडू चौधरी उपस्थित होते तसेच भजनी मंडळी साहित्य कासोदा येथे ना.पाटील याचे स्विय सहाय्यक हेमंत नारखेडे व नारायण आप्पा कोळी यांनी साहित्य पोहच दिले
कासोदा ग्रामस्थ यांनी आभार मानले.