Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » क्रिप्टोकरन्सी आधुनिक गुंतवणूकीचा नवा मार्ग
    जळगाव

    क्रिप्टोकरन्सी आधुनिक गुंतवणूकीचा नवा मार्ग

    editor deskBy editor deskSeptember 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे अर्थ व वाणिज्य मंडळाचे आणि अर्थशास्त्र विभागाच्या 2024 -25 या वर्षाच्या भीत्ती॑पत्रकाचे उद्घाटन दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ. ए .डी. वळवी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल हौसे सर उपस्थित होते.

    प्राध्यापक विशाल हौसे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रिप्टो करेंसी म्हणजे काय ,बिटकॉइन म्हणजे काय यात गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध ॲप तसेच यातील गुंतवणुकी संदर्भात सुरक्षितता व धोके या संदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले तर प्राचार्य डॉ. ए .डी .वळवी सर यांनी अर्थशास्त्राचे विविध क्षेत्रातील महत्त्व विशद केले तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. ए .वारडे सर यांनी प्रास्ताविक सादर केले यात त्यांनी वाणिज्य भागातील गुणवंत यांची नावे व अर्थ व वाणिज्य विभागामार्फत राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गौरव महाजन सर यांनी केले तर अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.ज्योती महाजन यांनी अर्थशास्त्र विषयाच्या 2024 -25या वर्षाच्या भित्तीपत्रकाच्या उद्घाटन संदर्भातील माहिती दिली तर आभार डॉ .हर्षल भालेराव सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड प्रशांत क्षत्रिय सर यांनी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते व अर्थ व वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.