जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील शेतकरी रमेश चव्हाण या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. या शेतकरी कुटुंबावार कमवता व्यक्ती गेल्याने आर्थिक संकट कोसळले याची जाणीव जळगाव शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांना झाली.
त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे यांच्या सहकार्याने या मयत शेतकरी रमेश चव्हाण यांच्या पत्नी झिपाबाई चव्हाण यांचा गोपिनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला व त्यासाठी पाठपुरावा करून त्यांना दोन लाख रुपयांची रक्कम मिळवून दिली.झिपाबाई चव्हाण यांना गोपिनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,पवन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी जळगाव दुध संघाचे सदस्य रमेश पाटील , जळगाव तालुका शिवसेना समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण,जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन नारायण पाटील,कविश्वर पाटील, प्रविण पाटील, वसंतवाडीचे माजी उपसरपंच गजमल पवार हे उपस्थित होते.