• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ जळगावात आजपासून रंगणार !

editor desk by editor desk
August 22, 2024
in जळगाव, राष्ट्रीय, सामाजिक
0
‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ जळगावात आजपासून रंगणार !

जळगाव : प्रतिनिधी

आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक महोत्सव ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यासाठी शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला असून एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.

जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं यासाठी अनेक संस्था, व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहेत. शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मोलाचा हातभार लागावा यासाठी बालवयातच आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी – विद्यार्थिनींना व्हावी, त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा आयाम लाभून उद्याचा जागरुक व सुसंस्कृत नागरिक घडावा, या उद्देशाने दि. २२ ते २५ ऑगस्टदरम्यान या महोत्सवाचे आयोजन आ. राजूमामा भोळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे यंदा पहिलेच वर्ष आहे.

महोत्सवात गुरुवारी दि. २२ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी सकाळी १०. ३० वाजता उदघाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर महोत्सवाला सुरुवात होईल. पहिले रांगोळी व मेहंदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय व खुला गटात समूह गायन स्पर्धा ११ वाजता सुरु होईल. दुपारी १ वाजता एकल नृत्य स्पर्धा तर दुपारी ३ वाजता महिला भजनी मंडळाचा गायन महोत्सव होणार आहे. एकंदर या स्पर्धेत कलाकारांना त्यांची कला सादर करण्यास मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेचे समन्वयन सचिन महाजन, दिपक महाजन, पंकज बारी हे करीत आहे. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.

 

Previous Post

या राशीतील लोकांनी अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊ नका !

Next Post

कंटेनरच्या जबर धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर

Next Post
कंटेनरच्या जबर धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर

कंटेनरच्या जबर धडकेत दुचाकीवरील पत्नी ठार तर पती गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group