Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हे सरकार लेना बँक नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
    राजकारण

    हे सरकार लेना बँक नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskAugust 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक ठिकाणी मेळावे सुरु असून नुकतेच आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. या सोहळ्यात फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न झाले, पोर्टल बंद पाडण्यासाठी जंक डेटा टाकला असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
    या कार्यक्रमासाठी पुण्याचेच निवड करण्यामागचे कारण फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सांगितले आहे. ते म्हणाले,

    ”आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणीची ही औपचारिक सुरूवात झाली आहे. याची सुरूवात पुण्यातूनच का असे विचारण्यात आले. तर त्या मागचे कारण म्हणजे जेव्हा परकीयांचे आक्रमक झाले तेव्हा जिजाऊंनी याच पुण्यात सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती. तसेच महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महमात्मा ज्योतिबा फुले यांनी याच पुण्यातून शाळा सुरू केली. पुणे ही समाजकारणाची भूमी आहे. म्हणूनच आज या सोहळ्यासाठी पुण्याची निवड केली”, असे फडणवीस म्हणाले.

    फडणवीसांनी यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ”हे सरकार देना बँक आहे लेना बँक नाही. पूर्वी वसुली करणारे सरकार होते आता बहिणींना देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निर्धार आहे. ही खटाखट नव्हे तर फटाफट योजना आहे”, असे फडणवीस म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.