• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण

editor desk by editor desk
August 15, 2024
in क्राईम, भुसावळ, राज्य
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील खडका गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या पुतण्याचा रस्ता आडवून दोघांना बेदम मारहाण करून दुचाकीचे नुकसान केले. ही घटना रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील खडका परिसरात तुषार वासुदेव भोळे (वय ३२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक महिन्यापूर्वी तुषार भोळे याने प्रेमविवाह केलेला आहे. या रागातून रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तुषार भोळे दुकानावर बसलेला असताना गावात राहणारा सागर दगडू पाटील याने तुषारला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर तुषार हा पुतण्यासोबत दुचाकीने घरी जात असतांना सागर पाटील व इतरांनी दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केली. या घटनेबाबत तुषार भोळे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर दगडू पाटील, पवन मंगलसिंग पाटील, योगेश सुपडूसिंग महाजन, मनिष कमलाकर धांडे, तेजबहादुरसिंग सरेंद्रसिंग पाटील, विशाल सामसिंग पाटील, रजत नानासिंग पाटील, पृथ्वीसिंग राजेंद्रसिंग पाटील, प्रशांत रामसिंग पाटील, सुरेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, अरुणसिंग नारायणसिंग पाटील, राजेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, शारदा राजेंद्रसिंग पाटील आणि श्यामसिंग पंचमसिंग पाटील सर्व रा. खडका ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

Previous Post

बापरे : ६ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

बारामती विधानसभा मतदार संघाबाबत अजित पवारांचे सूचक विधान !

Next Post
बारामती विधानसभा मतदार संघाबाबत अजित पवारांचे सूचक विधान !

बारामती विधानसभा मतदार संघाबाबत अजित पवारांचे सूचक विधान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group