• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मिळणार मान सन्मान

आजचे राशिभविष्य दि २७ जुलै २०२४

editor desk by editor desk
July 27, 2024
in राशीभविष्य
0
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

मेष राशी
या राशीच्या लोकांना आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या राशीवर शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. अचानक पैसा खर्च होईल. भावांशी संबंध चांगले ठेवा. त्यामुळे फायदा होईल. तुमचं रागावर नियंत्रण नसतं. तुमच्या रागामुळे नात्यात कटुता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला विचार करूनच बोलावं लागेल. लव्ह लाइफमध्ये तणाव होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज शेअर बाजारात गुंतवणूक करा. मात्र गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वृषभ राशी
आज जास्त उतावळेपणा करू नका. नाही तर नुकसान होईल. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हीच दुखी व्हाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडथळे येतील. या महिन्यात अधिकचा खर्च झाल्याने कुटुंबाचं बजेट कोलमडेल. तुम्हाला शेजारी आणि मित्रांची चांगली साथ मिळेल. तुम्ही आज प्रत्येक आव्हानांचा सामना कराल. जीवनसाथीची भक्कम साथ मिळेल.
मिथुन राशी
आज तुमचा दिवस संमिश्र असणार आहे. जर तुम्ही एखाद्या कार्यात किंवा व्यवसायात गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी पटणार नाही. मुलामुलींच्या भविष्याची चिंता वाटू लागेल. मुलांच्या शिक्षणाबाबत आणि त्यांच्या करिअरबाबत तुम्ही आज मोठा निर्णय घ्याल. लग्नाचा योग आहे. अविवाहितांनी मनासारखं स्थळ चालून येईल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क राशी
आज आशेचा किरण दाखवणारा दिवस आहे. तुमची अडलेली सर्व कामे आज मार्गी लागतील. त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. आळस झटकावा लागेल. आयात निर्यातीचं काम करणाऱ्यांना व्यवसायात सुख मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी तुमच्या कामावर प्रभावित होतील. तुमची स्तुती करतील. बुद्धी आणि विवेकाने केलेल्या कामात फायदा होईल. जीवनसाथीची साथ मिळेल. कुटुंबात लहान मुलासोबत वेळ घालवाल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी
आजचा दिवस सिंह राशीसाठी अत्यंत चांगला आहे. ज्यांचे कुटुंबीय विदेशात राहतात त्यांच्याकडून आज सुखद समाचार येण्याची शक्यता आहे. लग्न करून इच्छिणाऱ्यांना आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही उदार मनाने लोकांना मदत कराल. पैसाही खर्च कराल. जीवनसाथीचा आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत मिळेल. संध्याकाळी धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात मन रमेल. तुमच्या कामामुळे तुम्हाला मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना आज यश मिळणार आहे. वाहने जपून चालवा. दूरचा प्रवास करणं टाळा. आज वडिलांची प्रचंड आठवण येईल.

कन्या राशी
कन्या राशीसाठी आजचा दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आज तुमच्या बौद्धिक क्षमता आणि पूर्व अनुभवाचा तुम्हाला लाभ मिळेल. आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी तुम्हाला आज प्रयत्न करावे लागणार आहेत. जे खर्च करायचे नाहीत, असे खर्च तुम्हाला आज करावे लागणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या भावाची आणि मित्रांची साथ मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यात तुम्ही पुढाकार घ्याल. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मोठी भूमिका निभावाल. नोकरीच्या ठिकाणी जीभेवर नियंत्रण ठेवा, नाही तर वाद होतील. लव्ह लाइफमध्ये सुखद अनुभव येईल.

तुळ राशी
आज व्यवसायात कुटुंबातील लोकांची साथ मिळेल. त्यामुळे तुमची एखादी चिंता दूर होईल. मात्र, आज तुमच्यावर कामाचा अधिक लोड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नियोजन करावं लागेल. कामाचा लोड वाढल्याने तुमच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होईल. नोकरी करणाऱ्यांना आज अधिकचे अधिकार मिळतील, त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. संध्याकाळी कोणतंही अडचणीचं काम करू नका. आज तुम्ही मनपसंत भोजनाचा अस्वाद घ्याल.

वृश्चिक राशी
आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात योजनांचा लाभ होईल. यापूर्वी जी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा होईल. आज प्रेयसीसोबत डेटिंगला जाण्याचा बेत आखाल. कोर्टकचेरीच्या कामातून मुक्तता मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद सामंजस्याने सोडवा. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवासात वायफळ खर्च करू नका. व्यवसातील कर्मचाऱ्यांवर वाजवीपेक्षा अधिक विश्वास टाकू नका. नाही तर अडचणी येतील.

धनु राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेल. तुमची जीवनसाथी आज तुमची अर्धवट इच्छा पूर्ण करेल. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नव्या नोकरीचं ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे. अहंकारी लोकांचं गर्वहरण झाल्याचं पाहायला मिळेल. आज संध्याकाळपर्यंत अर्धवट राहिलेली कामे मार्गी लागतील. भविष्यातील योजना आखाल. पार्टनरसोबतच्या नात्यात आलेली कटुता दूर होईल.

मकर राशी
गेल्या काही काळापासून राहिलेलं काम मार्गी लागेल. त्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कामकाजातील व्यस्ततेमुळे तुम्ही लव्ह लाइफमध्ये वेळ काढू शकणार नाही. कौटुंबिक संपत्तीचं प्रकरण बुर्जुगांच्या मध्यस्थीने मार्गी लावाल. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आज तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. नवीन बाईक घेण्याचा योग आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा आहे.

कुंभ राशी
या राशीचे स्टार आज बुलंद आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. तुमच्या राशीतील ग्रह तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळेच तुम्ही आज हात लावाल त्याचं सोनं होणार आहे. एखादं काम हाती घेण्याआधी आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. त्याने तुम्हाला यश मिळेल. तुमच्या चांगल्या कार्याने कुटुंबाचं नाव रोशन होईल. व्यापारात आज मोठी डील कराल. त्यामुळे तुमच्या गंगाजळीत मोठी भर पडणार आहे. वैवाहिक जीवनात खटके उडतील. आज प्रवासाचा बेत आखाल.

मीन राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा राहील. जीवनसाथीची भरपूर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. त्यामुळे चेहऱ्यावर समाधानाचे भाव राहतील. मुलाच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण व्यावसायिकांना आजच्या दिवशी मोठी खोट बसणार आहे. नोकरीच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याची चांगली साथ मिळेल. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सासूरवाडीला जाण्याचा योग आहे. वाहन खरेदीचा योग आहे.

Previous Post

पोलीस हवालदाराने घेतली ५० हजारांची लाच

Next Post

धरणगाव पोलीस ठाण्यात दबंग पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती

Next Post
धरणगाव पोलीस ठाण्यात दबंग पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती

धरणगाव पोलीस ठाण्यात दबंग पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं
क्राईम

संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं

July 13, 2025
मोठी दुर्घटना :  मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !
क्राईम

मोठी दुर्घटना : मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !

July 13, 2025
मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group