Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव धडकेत वृद्ध ठार
    क्राईम

    भरधाव धडकेत वृद्ध ठार

    editor deskBy editor deskJuly 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मुलाकडून जेवणाचा डबा घेऊन जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे पेमा सुडिया बारेला (६८, रा. कठोरा, ता. जळगाव) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री जळगाव ते भोकर रस्त्यावर झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मूळचे इंद्रापूर, जि. बडवाणी (मध्यप्रदेश) येथील रहिवासी असलेले पेमा बारेला हे सध्या तालुक्यातील कठोरा येथे राहत होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या मुलाकडून जेवणाचा डबा घेऊन पायीच घरी जात होते. त्यावेळी त्यांना भरधाव दुचाकीने (क्र. जी. जे. ०५, जीपी ९१२६) जोरदार धडक दिली. अपघातानंतर बारेला यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), २८१, १२५ (ए), १२५ (बी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोने करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.