Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बीएसएनएल कार्यालयात चोरी : एकाला पोलिसांनी केली अटक
    क्राईम

    बीएसएनएल कार्यालयात चोरी : एकाला पोलिसांनी केली अटक

    editor deskBy editor deskJuly 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी बॅटरी केबल व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री घडली. यात एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सलमान शेरू पिंजारी (२१, रा. कुर्बान नगर, पाचोरा, ह.मु, जळगाव) यास अटक करण्यात आली. दुसरा पसार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा रोडवरील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला यात अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीची बॅटरी, दोन हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर, तीन हजार रुपये किमतीची तांब्याची तार असा पंधरा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. वॉचमन शरद पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान, यातील सलमान पिंजारी यास अटक करण्यात आली. त्याने जावेद उर्फ जाबिरबलू पिंजारी (२१, रा. कुर्बाननगर, पाचोरा) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. परंतु तो पसार झाला आहे. सलमान यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.