जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सुरु असतांना आज पहाटे जळगाव जेलमधील एका आरोपीची काही तरी वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.