जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनीपेठ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गेल्या आठ महिन्यापासून व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनैसर्गिक अत्याचार करण्यात येत होता. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पश्चिम बंगाल येथील तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ भागातील एका 14 वर्षेीय अल्पवयीन मुलाचे फोटो व व्हिडिओ संशयित सायत असित पांडा राहणार पश्चिम बंगाल याने घेतले होते. फोटो सोशल मीडियार व्हायरल करेल अशी धमकी देत त्या अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे बनावट अकांऊट तयार करुन व्हायरल केले. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलाच्या आईने ४ जुलै रोजी रात्री सायत असित पांडा (वय २०, पश्चिम बंगाल) यांच्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करत आहेत.