मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमी पुणे शहराचे मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे आपल्या आंदोलनामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली मात्र त्यांना उमेदवारांनी नाकारल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून येत्या ९ जुलै रोजी ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. मनसेच्या स्थापनेपासून वसंत मोरे राज ठाकरे यांच्यासोबत होते. पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. आज त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ९ जुलैला ते ठाकरे गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. त्यांना अगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
९ तारखेला मातोश्रीवर समर्थकांसह प्रवेश करणार आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमध्ये गेलो होतो. पण मतदारांनी स्विकारलं नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.