• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुरे चोरणारी टोळी जेरबंद ; १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

editor desk by editor desk
July 2, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
गुरे चोरणारी टोळी जेरबंद ; १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : प्रतिनिधी

वेगवेगळ्या ठिकाणाहून गुरांची चोरी करणारी टोळी निंभोरा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ म्हैशीसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील निंभोरा, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड ग्रामीण व मध्यप्रदेशातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हशींची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी निंभोरा पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. यातील संशयित हे मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच यातील संशयित तुकाराम रुमालसिंह बारेला (रा. बोरी, जि. बऱ्हाणपूर) हा यावल येथे असल्याची माहिती सपोनि हरिदास बोचरे यांना मिळताच त्यांनी फैजपूरचे सपोनि नीलेश वाघ यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी संशयित तुकाराम बारेला याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने म्हशी चोरल्याची कबुली दिली.

इतर संशयितांच्या शोधार्थ पथक मध्यप्रदेशात रवाना झाल्यानंतर पथकाने धर्मेंद्र दुरसिंग बारेला (रा. ढेरिया, जि. खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा, जि बऱ्हाणपुर), सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला, जि. बऱ्हाणपुर), मस्तीराम काशीराम बारेला (रा. न्हावी, ता. रावेर) यांच्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ म्हशी, २ बोलेरो वाहने व दोन दुचाकी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित चोरट्याने एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या धर्मेंद्र बारेला याच्याविरुद्ध मध्यप्रदेशात १४ गुन्हे दाखल असून पंधना पोलिस ठाण्यामध्ये तो हिस्ट्रीशीटर आहे. तसेच बऱ्हाणपूर, खंडवा, खरगोन, हरदा या चार जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तपासादरम्यान ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावरुन ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाली होती.

Previous Post

आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता

Next Post

भरदिवसा बंद घर फोडत लाखो रुपये लंपास

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भरदिवसा बंद घर फोडत लाखो रुपये लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group