Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : भावासह दोन मित्रांनी केला बहिणीवर अत्याचार
    क्राईम

    संतापजनक : भावासह दोन मित्रांनी केला बहिणीवर अत्याचार

    editor deskBy editor deskJune 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलतबहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलतभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २७ वर्षीय महिला नातेवाइकाकडे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी ती कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओदेखील तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या घरी चुलतभावाने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार करणे सुरूच ठेवले. त्याने अन्य दोन मित्रांनादेखील सोबत आणले व तिघांनी वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी (२३ जून) चुलत भाऊ तसेच त्याचे दोन मित्र अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दत्तात्रय पोटे करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.