Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारण नसतांना तरूणाला फायटरने मारहाण
    क्राईम

    कारण नसतांना तरूणाला फायटरने मारहाण

    editor deskBy editor deskJune 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील ख्रिश्चन कब्रस्थान परिसरात काहीही कारण नसतांना एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करून गळ्यातील सोन्याची चैन व दीड हजार रूपयांची रोकड जबरी काढून नेल्याची घटना शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी २२ जून रोजी रात्री साडेबारा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट सुरेश बनसोडे (वय ३४) रा. स्नेह नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता सम्राट बनसोडे हा तरूण भुसावळ शहरातील ख्रिश्चन कब्रस्थानजवळ उभा होता. त्यावेळी विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ हे दोन जण सम्राट जवळ गेले. व काहीही कारण नसतांना त्याला फायटरने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सम्राटला जखमी करत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि खिश्यातील दीड हजारांची रोकड जबरी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी शनिवारी २२ जून रोजी रात्री १२.३० वाजता तरूणाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    . नाशिक हादरले : ५८ व्हिडिओंसह तथाकथित गुरूचा काळा कारनामा उघड !

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.