चाळीसगाव : प्रतिनिधी
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन दुचाकी शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केली आहे. तसेच चोरट्यांनी अटक करण्यात आली. ही कारवाई दि.१७ रोजी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, नानासाहेब सुदाम आहेर (रा. जळगाव खु॥ ता. नांदगाव जि. नाशिक) यांची ७० हजार रुपये किमतीची दुचाकी घाटरोड, चाळीसगाव येथील विठ्ठल सभा मंगल कार्यालय जवळून दि.१६ रोजी चोरीस गेल्या बाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास पथक स्थापन केले. या पथकाने घाटरोड बायपास परिसरात सुनील रघुनाथ मेंघाळ (२२), तुळशीराम मच्छिंद्र जाधव (१९) कचरू शिवा मेंघाळ (१९) आणि अन्य एक अल्पवयीन आरोपी सर्व रा. कोळवाडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल व इतर दोन मोटारसायकली असे एकूण १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या एकूण ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ राहुल सोनवणे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, पवन पाटील, ज्ञानेश्वर गीते, मनोज चव्हाण, राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों राहुल सोनवणे व पोकों ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.