लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून ग्रामस्थ आणि मुलीकडील कुटुंबियाने मुलाच्या कुटुंबांसह मुलीला मारहाण करत छळ केला. हा प्रकार धक्कादायक समोर आल्याने त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडीयात व्हायरल झाले आहे. आपल्यावर छळ होत असल्याची तक्रार मुलाकडील नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट घेवून कारवाईचे निवेदन दिले आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील तरूण व तरूणी हे सज्ञान असून त्यांनी १५ ऑगस्टला आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलाविले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली. मात्र आता मुलगी परत द्या म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक मुलाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहे. गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाहीतर जीवे मारणयाची धमकीही मुलीच्या कुटुंबियांकडून दिली जात आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररित्या हा विवाह केला असून आम्हाला न्याय मिळावा मिळावी अशी मागणी दाम्पत्याने केली आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे. अखेर कंटाळून तरूणाने बुधवारी १२ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट घेवून कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.