Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात ५० किलो गांजासह एक अटकेत
    क्राईम

    चाळीसगावात ५० किलो गांजासह एक अटकेत

    editor deskBy editor deskJune 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमाकडून सुमारे १० लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण २२ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून, तो पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई १६ रोजी करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, अशोक भरतसिंग पाटील (५४, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) हा चाळीसगाव शहरामध्ये गांजा विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक संदीप पाटील, जितेंद्र धनराळे निवासी नायब तहसीलदार, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, राहुल भीमराव सोनवणे, विनोद विठ्ठल भोई, पोना महेंद्र प्रकाश पाटील, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पवन कृष्णा पाटील, विजय रमेश पाटील, ज्ञानेश्वर विलास गिते. मनोज मोरसिंग चव्हाण, राकेश मुरलीधर महाजन, रवींद्र निंबा बच्छे, महिला पोकों स्नेहल मांडोळे, अनिकेत जाधव, प्रवीण जगन्नाथ वाणी (चाळीसगाव) यांनी अशोक पाटील याच्याकडून १० लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण २२ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोकों उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.