Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास महिलेचा घरात घुसून विनयभंग !
    क्राईम

    रात्रीच्या सुमारास महिलेचा घरात घुसून विनयभंग !

    editor deskBy editor deskJune 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अंगलट करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार १२ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लोणवाडी गावातील एका भागात २२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १२ जून रोजी रात्री ११ वाजता त्याच गावात राहणारा संशयित आरोपी मिलीन हा महिलेच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेशी अंगलट करून अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मिलीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.