Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्लॉट नावावर करून देतो म्हणत तरुणाची १८ लाखात फसवणूक
    क्राईम

    प्लॉट नावावर करून देतो म्हणत तरुणाची १८ लाखात फसवणूक

    editor deskBy editor deskJune 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बखळ प्लॉट नावावर करून देतो असे सांगून जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील एका तरुणाची १८ लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, गौरव रवींद्र पवार (वय ४०, रा. कोजागिरी बंगलो, मुक्ताईनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याची चंद्रकांत सतीश तोष्णीवाल (रा. आदर्श नगर, जळगाव) याच्याशी १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून चंद्रकांत तोष्णीवाल याने गौरव पवार याच्याकडून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, हे पैसे घेतल्यावर देखील चंद्रकांत तोष्णीवाल यांनी हा प्लॉट गौरवच्या नावावर केला नाही. अनेक महिने होऊनही हा प्लॉट आपल्या नावावर न झाल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गौरवने पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी चंद्रकांत तोष्णीवाल यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे गौरव पवार याने रामानंदनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.