Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दहशत माजविणारा अटकेत
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दहशत माजविणारा अटकेत

    editor deskBy editor deskJune 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतीनिधी

    शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार १२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजल शेख कादिर वय-१८, रा. मास्टर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील तांबपुरा परिसरात असलेल्या खदानीजवळ फैजल शेख कादीर हा हातात तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, चंद्रकांत पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर टापकर यांनी बुधवारी १२ जून रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत संशयित आरोपी फैजल शेख कादिर याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ललित नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.