जळगाव : प्रतिनिधी
भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा. तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर तो परिसरातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला.
सविस्तर वृत्त असे कि, भोलासिंग बावरी याने ११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकों राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी अटक केली होती. त्याला बुधवार, १२ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर बाहेरून तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहित उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. बावरी याच्यावर या पूर्वीर्ह एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्ह पेठ पोलिस ठाणे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे या ठिकाण घरफोडी, खंडणी, गंभीर दुखापत करणे विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.