Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात ३ धारदार हत्यारासह एक अटकेत
    क्राईम

    चाळीसगावात ३ धारदार हत्यारासह एक अटकेत

    editor deskBy editor deskJune 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहर पोलिसांच्या पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपीची घरझडती सुरू असताना एकाच्या घरात ३ धारदार हत्यारे सापडली. या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.

    सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करतानाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, समाधान बळीराम निकम (शिव कॉलनी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने त्याच्या घरात कोयता व सुऱ्यासारखे धारदार हत्यार ठेवले आहेत.या माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घराच्या बैठक रूममधील लोखंडी पलंगाच्या बॉक्समध्ये लोखंडी धारदार कोयता व दोन लोखंडी सुरे, अशी एकूण ३ धारदार हत्यारे सापडली. ही तिन्ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

    या इसमाविरुद्ध पोकों आशुतोष दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भूषण पाटील, पोकों विजय पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, मनोज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व ज्ञानेश्वर पाटोळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.