अमळनेर : प्रतिनिधी
शटर व कुलूप तोडून चार दुकानातून मोबाइल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरीस गेल्याची घटना ९ रोजी रात्री उशिरा ते १० जून सकाळच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे कि, खड्डा जीनला लागून असलेल्या दुकानाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे वरचे अर्धे शटर कापलेले दिसून आले. दुकानदाराने पाहिले असता त्याच्या दुकानातील ग्राईंडर मशीन, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिकल साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरीला गेले होते. त्याच्या बाजूला असलेल्या दोन-तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाइल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून दुरुस्तीला आलेले ८ ते १० अँड्रॉईड मोबाइल, तसेच १२ मोबाइल आणि ७ ते ८ हजार रुपयांचे मोबाइलचे साहित्य चोरून नेले होते.
मयूर मोबाइलपासून एक दुकानाच्या आड असलेल्या सैय्यद इद्रीस यांचे सना इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे देखील कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले आहे. तीन महिन्यात सना इलेक्ट्रिकल दुसऱ्यांदा फुटले आहे. बाजूला असलेले संगम मोबाइल दुकानदेखील आधी मागच्या बाजूने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडले पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला.