Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लाखाची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत
    क्राईम

    लाखाची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत

    editor deskBy editor deskJune 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था

    सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच घेताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालक डॉ.सपना सुखदेव घोळवे (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे दरम्यान, याच प्रकरणात येथील समाजकल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहायक संचालक सपना घोळवे यांनी दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली.

    लाचलुचपत विभागाने बुधवारी समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले, तर समाजकल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम स्वीकारताना घोळवे यांना रंगेहात पकडण्यात आले, तर लाचेची मागणी करणाऱ्या निरीक्षक दीपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतिम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.