Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नीसोबत भांडला मैत्रिणीच्या घरी जावून झोपला अन उठलाच नाही
    क्राईम

    पत्नीसोबत भांडला मैत्रिणीच्या घरी जावून झोपला अन उठलाच नाही

    editor deskBy editor deskJune 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तराखंडच्या देहराडून या शहरातून समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नवरा त्याच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, सकाळी तो उठलाच नाही. मैत्रिणीने पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मैत्रिणीने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून, चौकशीची मागणी केली जात आहे.

    युवकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अझीम (वय ३०) हा मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेने याबाबत मित्राची पत्नी, दाजी आणि पोलिसांना फोनवरून माहिती दिली. अझीमची आई तारा बी यांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना महिलेने ती अझीमची पत्नी म्हणून असल्याचे सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.