Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आसोदा येथे हॉटेलमध्ये मालकाची गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    आसोदा येथे हॉटेलमध्ये मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

    userBy userJune 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आसोदा येथे प्रसिद्ध निर्भय हॉटेलचे मालक खेमचंद ज्ञानेश्वर चौधरी वय-२७ यांनी त्यांच्याच हॉटेलमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ३१ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    खेमचंद ज्ञानदेव चौधरी (रा.असोदा ता. जळगाव) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. तो असोदा गावामध्ये आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी यांच्यासह राहत होता. नवनाथ मंदिराजवळ असलेल्या हॉटेल निर्भयचा खेमचंद हा मालक होता.  हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. अनेक दिवसांपासून त्याला आर्थिक समस्या भेडसावत होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

    दरम्यान, शुक्रवारी ३१ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये कोणीही नसताना हॉटेलच्या मागच्या बाजूला एका शेडमध्ये खेमचंद चौधरी याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान खेमचंद हा फोन उचलत नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याला हॉटेलमध्ये पाहण्यास आले. त्या वेळेला ही घटना उघडकीस आली. यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

    खेमचंद याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान हॉटेल व्यवसायिकाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.