Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू
    क्राईम

    मोठी बातमी : पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू

    userBy userMay 29, 2024Updated:May 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा नदीत मुलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावातील यश राजेंद्र पवार वय ८ रा. वरखेडे ता. चाळीसगाव या चिमुकल्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    यश पवार हा बालक आपल्या पालकांसोबत चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गावातील काही मुलांसोबत गेलेला होता. तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो पाण्यात वाहून गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    राज्यात खळबळ : मंदिरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न: सीसीटीव्हीत कृत्य कैद !

    October 14, 2026

    देवीच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अंत; कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ

    October 14, 2026

    शाळा सुटल्यानंतरचा प्रवास ठरला अखेरचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.