Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेरी नाका स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत बेवारस मृतदेहांची विटंबना; स्थानिक नागरिकांचा जिल्हा प्रशासनावर रोष
    क्राईम

    नेरी नाका स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत बेवारस मृतदेहांची विटंबना; स्थानिक नागरिकांचा जिल्हा प्रशासनावर रोष

    userBy userMay 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात उन्हाचा पारा 45 वर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णघातामुळे अनेक जणांचा मृत्यू होत आहे. दरम्यान बेवारस असलेल्या मृतदेह नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मृतदेह पुरण्याचे काम सुरू आहे. परंतु हे मृतदेह वरच्यावर पुरले जात असून या ठिकाणी कुत्र्यांचा धुमाकूळ होऊन मृतदेहाची विटंबना होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे यांच्यासह नागरिकांनी रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता आंदोलन करत जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहे.

    जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचा पारा 45° वर पोहोचले आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेले इतर काही बेवारस नागरिकांचा उष्णघातामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान या उष्णतामुळे मृत्यू झालेल्या बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत मृतदेह पुरले जात आहे. परंतु हे मृतदेह वरच्यावर पुरले जात असल्या कारणामुळे कुत्र्यांचा धुमाकूळ घालत असून  मृतदेहाची विटंबना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. दरम्यान या अनुषंगाने रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करून इतर मोकळ्या जागेत या बेवारस मृतदेहांची पुरण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.