• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने संपविली जीवनयात्रा

editor desk by editor desk
May 8, 2024
in अमळनेर, क्राईम
0
डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने संपविली जीवनयात्रा

अमळनेर : प्रतिनिधी

नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

निकिता रवींद्र पाटील (वय १९) असे मयत तरुणीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील साने गुरुजी संकुलात प्रसिद्ध असलेल्या रामभाऊ चहावाले (लिबर्टी टी) चे संचालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची कन्या होती. भालेराव नगरात त्यांचे घर असून सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली. अर्ध्या तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस पंचनाम्यानंतर काल सायंकाळी अमळनेर ग्रामिण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निकिता ही अत्यंत गुणी तरुणी होती. साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला होता. गत वर्षी अखेरच्या वर्षाला असताना नुकतीच ती परीक्षा दिल्यानंतर सुट्या लागल्याने अमळनेरात आली होती.

शनीपेठ येथे तिच्या काकांकडे नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात देखील निकिताने आनंदात मौजमजा ही केली होती. असे सारे काही अलबेल असताना तिने आत्म्याहत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. या घटनेने तिच्या कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. या घटनेने शनीपेठ व भालेराव नगर परिसरात शोकळला पसरली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Previous Post

उद्याच्या भविष्यासाठी करण पाटील मला खासदार पाहिजे : उध्दव ठाकरे

Next Post

वसंतवाडीत तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post
वसंतवाडीत तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वसंतवाडीत तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेते सुनील शेट्टीच्या मुलीने ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम !
राज्य

अभिनेते सुनील शेट्टीच्या मुलीने ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम !

May 22, 2025
राज्यात कोरोना वाढतोय : एकाच दिवसात २६ रुग्ण !
आरोग्य

राज्यात कोरोना वाढतोय : एकाच दिवसात २६ रुग्ण !

May 22, 2025
…हात लावला तर खबरदार; आदित्य ठाकरेंनी दिला इशारा !
क्राईम

…हात लावला तर खबरदार; आदित्य ठाकरेंनी दिला इशारा !

May 22, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

पैसे मागितल्याचा राग : हॉटेलचालकासह कामगारास मारहाण !

May 22, 2025
बॅटरी चोरणाऱ्या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या !
क्राईम

बॅटरी चोरणाऱ्या दोघांना २४ तासात ठोकल्या बेड्या !

May 22, 2025
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !
क्राईम

घरगुती वाद वाढला : पतीने केला पत्नीवर हातोड्याने हल्ला !

May 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group