Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा
    चाळीसगाव

    एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

    editor deskBy editor deskMay 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे.

    यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी

    एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य संघटना निरंतर लढत असते. एकलव्य संघटनेच्या विचारांच्या माध्यमातून गाव खेड्यावर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल संघटनेने त्यांचे अभिनंदन केलेले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ व सबका विकास या धोरणावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघ व 77 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वीर एकलव्य संघटनेने भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
    एकलव्य संघटनेचे हे पाऊल अत्यंत अभिमानाचे असून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दात श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेच्या भूमिकेचे स्वागत केलेले आहे.

    यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री पवन राजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकर दादा वाघ, प्रदेश सचिव श्री. मधुकर पवार, प्रदेश उपाध्यक्ष श्री बाळासाहेब बर्डे, जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष श्री संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष श्री निवृत्ती पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष श्री रवि सोनवणे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    June 15, 2026

    देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

    June 15, 2026

    घरकामाच्या बहाण्याने डल्ला; मोलकरणीच्या चोरीने लेक साईट रेसिडेन्सी हादरली

    June 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.