Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक : लग्नपत्रिका, लग्नात मतदानाची शपथ घेऊन करणार जनजागृती..!
    जळगाव

    जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक : लग्नपत्रिका, लग्नात मतदानाची शपथ घेऊन करणार जनजागृती..!

    editor deskBy editor deskMay 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    प्रत्येक तरुण हा आपला लग्न मोठ्या हौस मौजेत करत असतो व लग्न सोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन करत असतो. अशाच प्रकारे जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवद गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणांनी आपल्या लग्न पत्रिकेतून तसेच लग्नात वऱ्हाडी मंडळीसह मतदानाची शपथ घेऊन मतदानाबद्दलची जनजागृती करणार आहे. त्यामुळे आजच्या तरुणांसमोर अनोखा आदर्श विजयने उभा केला आहे.

    विजय पाटील यांचे ५ मे रोजी लग्न सोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे. त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक असल्याचा यातून सिद्ध केला आहे.

    स्तुत्य उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
    विजय पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या विजयाला शुभेच्छा दिल्या आहे. विजयच्या लग्न सोहळ्याच्या दिवशी सोहळ्याला उपस्थित सर्व वराडे मतदानाची शपथ घेतील असे सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.