Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अयोध्यानगर, तांबापूरा, शनीपेठ परिसरासह इतर भागात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; ४ लाखा मुद्देमाल जप्त, ११ जण ताब्यात
    क्राईम

    अयोध्यानगर, तांबापूरा, शनीपेठ परिसरासह इतर भागात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; ४ लाखा मुद्देमाल जप्त, ११ जण ताब्यात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ५ जानेवारी रोजी रात्री एकाच वेळी अयोध्यानगर, तांबापूरा, शनीपेठ परिसरासह इतर भागात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. यात एमआयडीसी पोलीस हद्दीत तीन ठिकाणी, जिल्हापेठ हद्दीत चार ठिकाणी तर शनीपेठ पोलीसांनी तीन ठिकाणी असे एकुण १० ठिकाणी छापा टाकला. यात ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाखाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरात दोन दिवसांपुर्वी पोलीसांनी सट्टा व जुगार अड्ड्यांवर पोलीस अधिक्षकांनी धाडसत्र राबविण्यात आाले होते. त्यानंतर पोलीसांनी बुधवार ५ जानेवारी रोजी रात्री विना परवाना गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली आहे. यात एमआयडीसी पोलिसांनी आयोध्या नगर परिसरात प्रमोदकुमार नरेश सैनी (वय १९) याच्या राहत्या घरात छापा टाकला असता त्यात २ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. तांबापुरा भागात मच्छी मार्केट परिसरात गजानन विष्णू भोई (वय ३९,रा.गवळीवाडा) याच्याकडून २ हजार ४२० रुपयांचा गुटखा पकडला तर दिलीप आत्माराम भोई याच्याकडून १ हजार ३२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्याशिवाय शनी पेठ पोलिसांनी नेरी नाका चौकात नितीन भिका महाजन (वय ४६,रा.कासमवाडी) याच्याकडून २ हजार २०० रुपयांचा वाल्मिक नगरात राहूल गोकुळ कोळी (वय २७) याच्याकडून ७ हजार ३१५ तर शनी मंदिर परिसरात चंद्रकांत सुभाष बाविस्कर याच्याकडून २ हजार २२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या हद्दीत चार ठिकाणी कारवाई करुन १० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. चारही जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भजे गल्लीत मुस्ताक रशीद पिंजारी (वय ४९), अल्ताफ अकबर पटेल (वय २३) स्टेडियम संकुलात सुनील बाबुराव विसपुते (वय ४५), चोपडा मार्केटमध्ये ज्ञानेश्वर बन्सी सपके (वय ५२) यांचा समावेश आहे. जिल्हापेठ, एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यात ११ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रूपये किंमतीचा गुटख हस्तगत करण्यात आला आहे.

    jalgaonpolice maharashtra police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025

    कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाखांची रोकड लंपास !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.