Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साईनगरात तरुण विवाहितेने संपविले आयुष्य
    क्राईम

    साईनगरात तरुण विवाहितेने संपविले आयुष्य

    editor deskBy editor deskApril 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगरात राहणाऱ्या ममता रतिलाल राठोड (वय ३०) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून तिच्या पतीने मारहाण करून तिला गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, ममता राठोड ही विवाहिता पती रतिलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होती. मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरुवारी रात्री १० वाजता राहत्या घरात ममता यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.