Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळविला
    क्राईम

    वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळविला

    editor deskBy editor deskApril 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शनी पेठ पोलिस चौकी जवळून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई करत मंगळवारी दुपारी १ वाजता पकडला. मात्र, चालकाने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा न करता भरधाव वेगाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, महसूल पथकाने विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता चालक नवनाथ रोहिदास बाविस्कर (३०, रा. कोळंबा, ता. चोपडा) याने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात न नेता, पसार झाला. मंडल अधिकारी छाया कोळी यांनी शनी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक रोहिदास बाविस्कर आणि मालक वैभव चौधरी (रा. चौघुले प्लॉट) यांच्या विरोधात शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.