विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज
दिवसेंदिवस निवडणुका या खर्चिक होत चाललेल्या आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लंके मामा दिंडोरीचे सर यांच्याकडे कुठे फंडिंग होता मग त्यांना उमेदवारी दिली भैयासाहेबांना का नाही हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बाजारांनी साहेबांना व आव्हाड व पाटलांना सांगून अगोदर तुमच्याकडे माल किती आहे हे दाखवा मगच तुम्हाला उमेदवारी अशी आट टाकली गेली. हे भैया साहेबांना सांगा तरच ते रिंगणातून माघार होतील असे नेत्यांचे कान भरले गेले मुक्ताईनगर आघाडीवर होते. भैय्यासाहेब यांची ओळख साहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून आहे.
परंतु पक्षात काल-परवा दाखल झालेले पक्षातील बाजारू काहींनी भैया साहेबांची कमकुवत बाजू नेत्यांजवळ सांगितली तिथूनच खरा श्रीरामाचा उदय झाला आणि दर्जी पण पोहोचला. मग सुरू झाले अर्थकारण प्रत्येक तालुक्यातील म्हणजे जवळपास सात प्रमुख पदाधिकाऱ्यांना खिशात भले मोठे… दिले गेले तिथेच भैय्यासाहेबांवरचे प्रेम हे बाजारू विसरले. फैजपूर व मुक्ताईनगर हे जरी भैया साहेबांची उमेदवारी कट करण्यामागे केंद्रबिंदू असले तरी जिल्ह्यातील काही नेत्यांनी देखील भैया साहेबांचे पंख छाटले. मानमोडी कर ही मागे राहिले नाही काही नाही दिले साहेबांनी यांना परंतु शेवटी पैसा बडा असेच म्हणण्याची वेळ आली आहे. भैया साहेबांना अनुकूल वातावरण असताना का त्यांची उमेदवारी कट केली गेली असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडत असल्यामुळे श्रीरामाला कात्रज चा घाट दाखवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हास्यास्पद विषय म्हणजे दर्जीने तर जळगाव शहरातील काही बाजारू ना फिरायला गाड्या दिले आहेत ते मतदार देखील नाही असो हा पक्षांतर्गत विषय आहे. संतोष भाऊंनी ज्या व्यक्तीला मोठे केले त्या फैजपूर वाल्याने देखील भाऊंचा राजकीय घात केला हे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भैया साहेबांसारखा प्रमाणिक नेत्याला डावलने म्हणजे भविष्यात चांगले कार्यकर्त्यांची वनवा पक्षात निर्माण होईल बाजारांचा भरणा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे याला नेतेच जबाबदार आहेत असेही म्हणावे लागेल. भैया साहेबांविरुद्ध हे षडयंत्र का रचले गेले हे भविष्यात लवकरच बाहेर येईल परंतु यात भैया साहेबांच्या आजूबाजूचे म्हणजेच अंतुरली चांगदेव मानमोडी रुईखेडा निमखेडी व राष्ट्रवादी कार्यालयातील युवक तीन प्रमुख पदाधिकारी सहभागी आहे. महान , निष्कलंक, कुणाचीही आजपर्यंत फसवणूक न केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या युवकांचा आयकॉन दर्जी सारख्या व्यक्तीच्या हातात साहेबांच्या राष्ट्रवादीची धुरा जात असेल तर हा भविष्यातील धोकाचा इशारा आहे.