• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : आ.एकनाथ खडसेंना जीवे ठार मारणाची धमकी

editor desk by editor desk
April 17, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य
0
मोठी बातमी : आ.एकनाथ खडसेंना जीवे ठार मारणाची धमकी

जळगाव : प्रतिनिधी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मला चार ते पाच फोन आले आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु हे प्रकरण मला गंभीर वाटत नाही. मला त्यात तथ्य वाटत नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करतील. त्यात काय येणार? ते पाहू या. एकनाथ खडसे यांना काही वर्षांपूर्वी दाऊदकडून धमक्या आल्या होत्या किंवा दाऊदच्या पत्नीशी त्यांचे संभाषण झाले होते? असे आरोप झाले होते. त्या प्रकरणाचा आता आलेल्या धमक्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? यावर खडसे म्हणाले, दाऊदच्या पत्नीशी संभाषण प्रकरणात एक व्यक्ती सापडला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती.

Previous Post

भांडण मिटवायला गेलेल्या चालकाला मारहाण

Next Post

जळगावात कंपनीला भीषण आग : २० पेक्षा अधिक कामगार गंभीररित्या भाजले

Next Post
जळगावात कंपनीला भीषण आग : २० पेक्षा अधिक कामगार गंभीररित्या भाजले

जळगावात कंपनीला भीषण आग : २० पेक्षा अधिक कामगार गंभीररित्या भाजले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group