जळगाव : प्रतिनिधी
शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेची गर्दीचा फायदा घेत, सोन्याची पोत लांबवल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन ३० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना टॉवर परिसरात शनिवारी घडली. शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटल्याने ती दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पोत सराफाकडे नेण्यासाठी एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलगा तसेच एका तरुणीला सोबत घेत दुपारी टॉवर चौकात आले. सुरुवातीला त्या फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत ब्लेडने पर्स कापून सोन्याची पोत असलेली पर्स लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने लागलीच शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
दुसऱ्या घटनेत चणे, फुटाणे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेकडून ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही महिला माल विक्री झाल्याने नवा माल घेण्यासाठी घरातील रोकड व माल विकलेले पैसे असे एकूण ३० हजाराची रोकड पिशवीत भरुन टॉवर चौकातून पायी चालत जात असताना चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील ३० हजाराची रोकड अलगद काढून घेत पसार झाले. याबाबत रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे