Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान
    राजकारण

    राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

    editor deskBy editor deskApril 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे.

    लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे.
    हवामान खात्याने वर्तविला अंदाज खरा ठरला आहे. मागील दोन दिवसापासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. आज सकाळपासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. भाजीपाला, फळबागा आणि अन्य पिकांना बुरशी लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.आंबा पिकाचे मोठे नुकसान भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील अकाळी पावसाची झळ ६५०६ शेतकऱ्यांना बसलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील एकूण ३४११ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे या तीनही तालुक्यांतील ३४११ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. १२३ गावांमधील ६५०३ शेतकऱ्यांना’अवकाळी’ची झळ बसली आहे. मक्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्यांचे काम सुरू केले. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. त्यात मक्याचे सर्वाधिक, तर ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, भाजीपाला, केळी, आंबा आणि लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.