जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी, आता वंचित बहूजन आघाडीकडून देखील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. रावेरमधून संजय ब्राम्हणे यांच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. आता जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुल्लकुमार लोढा यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.