Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : जळगावात आढळला कुजलेला मृतदेह
    क्राईम

    खळबळजनक : जळगावात आढळला कुजलेला मृतदेह

    editor deskBy editor deskApril 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील प्रशासकीय इमारतीच्या आवारातील कृषी कार्यालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणाचा संशयास्पदरीत्या जळीत अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेल्या रोहित्राजवळ दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा संशयास्पदरीत्या जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गधी येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उल्हास चहाटे, पो.कॉ. महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. रुग्णावाहिकेतून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. मयताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.