Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका ; आंबेडकरांचा इशारा
    राजकारण

    वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका ; आंबेडकरांचा इशारा

    editor deskBy editor deskApril 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : वृत्तसंस्था

    राज्यात आता लोकसभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना यात वंचित बहुजन आघाडी देखील मागे नाही, निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरणे कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

    आज वंचितच्या वतीने अकोलामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवरील भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका; आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनीही कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील नागरिक जे मुंबईमध्ये राहतात आणि जे दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.