Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात गळफास घेवून तरुणाने संपविले जीवन
    क्राईम

    शेतात गळफास घेवून तरुणाने संपविले जीवन

    editor deskBy editor deskApril 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शेतात ट्रॅक्टर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २३, रा. गढोदा, ता. जळगाव) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे हर्षल चौधरी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गावात ट्रॅक्टर चालवून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता, सोमवार दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हर्षल याने देवगाव ते किनोद रस्त्यावरील मंगल पाटील यांच्या शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच हर्षलच्या कुटुंबियांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. मुलाचा मृतदेह बघताच त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

    गावातील सतिष पाटील यांचे देवगाव ते किनोद रस्त्यावर शेत आहे. सायंकाळच्या सुमारास ते शेतातून घराकडे येत असतांना त्यांना शेतातील झाडाला तरुणाचा मृतदेह लटकेला दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती लागलीच ग्रामस्थांसह पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किरण अगोणे व दीपक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत हर्षल याला मयत घोषीत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.