• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.खडसेंच्या प्रवेशावर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया !

editor desk by editor desk
April 8, 2024
in राजकारण, राज्य
0
आ.खडसेंच्या प्रवेशावर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे. मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. चंद्रपूरनंतर रामटेक मध्ये देखील 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभांनी पूर्ण विदर्भातील वातावरण ढवळून निघेल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत, या प्रश्नाचेही थेट उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही. मात्र, पक्षाने या संदर्भात आम्हाला माहिती दिली तर त्यांचे देखील आम्ही स्वागतच करू, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत गेल्या काळामध्ये चर्चा झालेल्या आहेत. विशेषता जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा मनसेने हाती घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मधल्या काळात जरी त्यांची वेगळी भूमिका असली तरी देखील आज त्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला असल्याचे मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव भारताची निर्मिती केली आहे .अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी आमचे भूमिका आहे. ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम ही, भूमिका महत्त्वाची आहे, त्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे, असे मला वाटते. त्यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Previous Post

भरधाव कंटेनरचा थरार : डझनाहून अधिक कार-दुचाकींना दिली धडक

Next Post

बाळासाहेबांच्या विचाराच पुढे नेण्याचे काम शिंदे करताहेत ; पंतप्रधान मोदी

Next Post
बाळासाहेबांच्या विचाराच पुढे नेण्याचे काम शिंदे करताहेत ; पंतप्रधान मोदी

बाळासाहेबांच्या विचाराच पुढे नेण्याचे काम शिंदे करताहेत ; पंतप्रधान मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group