Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर भीषण अपघात : ५ भाविक ठार तर ३ गंभीर जखमी !
    क्राईम

    महामार्गावर भीषण अपघात : ५ भाविक ठार तर ३ गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskApril 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समजत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

    गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व परिसरात अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास नाशिक- दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीची जोराची धडक झाली. कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला. टायर फुटल्यानंतर कार प्रथम दुचाकीला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील 2, तर कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 3 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.