जळगाव विजय पाटील : भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज पाटील यांनी हाती शिवबंद बांधून त्यांचे मित्र व भाजपमधीलच पदाधिकारी करण पवार यांच्या पाठीशी उभे राहून भाजप विरुद्ध आता सामना पुकारला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असेल उमेदवार बदलण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजप कार्यालयात गुरुवारी दुपारपासून बैठकींचे सत्र सुरू पहावयास मिळाले. यावेळी माजी खासदार रे टी पाटील गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दारआड चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.
नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत इच्छुकांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या दोघांमध्ये भाजप कार्यालयातच बंद दाराआड चर्चा झाल्याने भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये होऊ लागले आहे.